गेल ऑम्वेट : ‘सांस्कृतिक क्रांतीसाठी जोतीराव फुलेंचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि याच भूमिकेतून मी हा विषय घेतला...’
जोतीराव फुलेंसमोर जे समाजचित्र होते, त्यात जातिनिहाय विषमता आणि जातीच्या नावाखाली शोषणाचा नुसता हैदोस सुरू होता. शोषित आणि शोषक या वर्गात एका बाजूला ब्राह्मणेतर आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण असे स्पष्ट गट पडले होते. जोतीराव फुलेंना म्हणूनच जी क्रांती हवी होती, ती इथल्या परिस्थितीला अगदी अनुरूप अशी होती. फुलेंनी सुचवलेली ‘समता’ केवळ सामाजिक नव्हती. त्यांनी ‘आर्थिक समता’सुद्धा तेवढ्याच हिरीरीने पुरस्कारली.......